Thursday, August 1, 2013

मी



मी म्हणजे नाइंटीस मधे, पुण्यात, एका सध्या
मराठी घरात वाढलेली. आई-बाबांची लाडकी लेक. बहीण-भावाची मोठी ताई. मैत्रिणींबरोबर सोसाइटी मधे लपा छापी,चोर पोलीस खेळून वाढले. दूरदर्शन वर चंद्रकांता, शक्तिमान, रामायण, आलिफ-लेयीला पाहायचे. शळेतून घरी आल्यावर दोन मिनिटात बनणारे मॅगी नूडल्स आणि कार्टून नेटवर्क. दर शुक्रवारी आणि शनिवार संद्याकाळी भरतनाट्याम चा क्लास. त्यामुळे उंची चांगली वाढली आणि आजोबा मला "लांबू टांग" म्हणायला लागले. आमच्या घरातला तो एक मोठा विनोद होता. दिवाळी, दसरा, गणपती म्हणल की आमच्या मॉडेल कॉलोनी मधे धमाका. पण इथे मात्र पेठे मधले राहणारे पुणेकर कसे एकमेकांशी खूप आपुलकीने वागतात तस नाही. फ़क्त कामापुरत आणि सणवार असला की एकमेकांशी बोलायच. लहान असताना बरेच लोक वाढदिवस असला की "आज तिचा हॅपी बर्थडे आहे" अस म्हणायचे ज्यावर आम्ही इंग्लीश मीडियम मधले मुल खूप हसायचो. पण वाढदिवस म्हणल की आई खूप लाड करायची आणि घरी पार्टी असायची. मे महिन्या मधे अजोळी गेल की आंबे, जांभुळ, पेरू, इत्यादी फळ आणि आजोबांनी बांधलेला झोका. मग सगळे जण बसले की म्हणायचे, "रेवती आता डॅन्स करून दाखव बर". मग माझ खूप कौतुक व्हायच. काही दिवसांनी शाळा संपली. दहावी संपली. आणि फर्गुसन च कॉलेज लाइफ. तेव्हा मैत्री काय ते समजल. त्यानंतर यूनिवर्सिटी मधे मास्टर्स. आता सर्व काही बिज़ी आणि हेक्टिक झाल होत. लहानपणापासून परदेशात शिकायचे स्वप्न (जे बर्‍याच तरुणांच अस्त). रिसर्च साठी जर्मनी मधे जायचे होते. तर बाबा म्हणायचे "जर मनात असेल तर जर्मनी". हा त्यांचा प्रिय विनोद. आता जर्मनी मधे बसून हे लिहिताना थोड चांग्ल, थोड वाईट वाटत आहे. चांगला कारण लहानाची मोठी होताना जे स्वप्न पाहील ते पुर्ण
झाल आहे तर वाईट वाटत आहे की लहानपाणाची "मी" आता खूप बदलले आहे.

No comments:

Post a Comment